Ad will apear here
Next
‘मौनांतर’ मूकनाट्य स्पर्धेत ‘बी अ मॅन’ प्रथम
‘ओह शिट’ एकांकिकेतील एक क्षण

पुणे : यावर्षी घेण्यात आलेल्या ‘मौनांतर’ या मूकनाट्य स्पर्धेत पुण्याच्या केसर प्रॉडक्शन्सची ‘बी अ मॅन’ एकांकिकेने पहिल्या क्रमांकावर नाव कोरले. पुण्याच्याच अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या ‘ओह शिट’ने दुसरा, तर डोंबिवलीच्या अॅबस्ट्रॅक्ट आर्टच्या ‘सीड ऑफ आर्ट’ एकांकिकेने तिसरा क्रमांक पटकावला.

‘बी अ मॅन’ या एकांकिका सादर करताना कलाकारपुण्यातील जी. एच. रायसोनीच्या ‘राम नाम सत्य है’ला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. वैयक्तिक पारितोषिके १५ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या बक्षीस समारंभादरम्यान जाहीर करण्यात येतील.

पुण्यातील पहिली मुकनाट्य स्पर्धा म्हणून ओखल्या जाणाऱ्या ‘मौनांतर’ या स्पर्धेचे यंदा पाचवे वर्ष आहे. यावर्षीची स्पर्धा पुणे व मुंबई अशा दोन ठिकाणी घेण्यात आली होती. सहा जुलै रोजी मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर, मिनी दादर येथे, तर सात व आठ जुलैला भरत नाट्यमंदिर येथे घेण्यात आली. यावर्षी एकूण २७ संघ सहभागी होते. पुण्यात एकूण २० संघ, तर मुंबईत एकूण सात संघ सहभागी झाले. स्पर्धेत यंदा पुणे, पिंपरी, चिंचवड, मुंबई, नवी मुंबई तसेच नाशिकमधील नामवंत संस्था, कॉलेज सहभागी होते.

‘सीड ऑफ आर्ट’मधील एक क्षणप्रसाद वनारसे आणि गिरीश परदेशी या स्पर्धेला परीक्षक म्हणून लाभले होते. स्पर्धेसाठी बुलडाणा अर्बन, सुनील चांदुरकर व गंगोत्री ग्रीनबिल्ड यांचे मोलाचे योगदान लाभले.

बक्षीस समारंभाविषयी :
दिवस :
रविवार, १५ जुलै २०१८
वेळ : सायंकाळी पाच ते आठ
स्थळ : भरतनाट्य मंदिर, पुणे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZUXBQ
Similar Posts
यंदा ‘मौनांतर’ पुण्यासह, मुंबईतही रंगणार पुणे : वाइड विंग्ज मीडिया, ड्रीम्स टू रिअॅलिटी व फेअरी टेल मीडिया स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या पाच वर्षांपासून पुण्यात आयोजन केली जाणारी मौनांतर मूकनाट्य स्पर्धा यंदा पुण्याबरोबरच मुंबईतही होणार आहे. मागील दोन वर्षांत या स्पर्धेला इतरही जिल्ह्यांमधून, विशेषतः मुंबईहून येणारा प्रतिसाद पाहता
मौनांतर मूकनाट्य स्पर्धेत ‘रायसोनी’चे यश पुणे : वाघोली येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘मौनांतर २०१८’ या मूकनाट्य स्पर्धेत यश मिळवत उत्तेजनार्थ पदक पटकावले. ड्रीम्स रिऍलिटी, वाइड विंग्स मीडिया आणि फेअरी टेल मीडिया यांच्या वतीने ही मूकनाट्य स्पर्धा घेण्यात आली होती.
लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ मुंबई : लोणावळा येथे ५० घोड्यांसोबत पठारी खेड्यांत ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप २०१८’ आयोजित करण्यात आली होती.
रसिक मित्र मंडळाच्या व्याख्यानाला प्रतिसाद पुणे : ‘न किसी की आँख का नूर हूँ, न किसी के दिल का करार हूँ, जो किसी के काम न आ सके, मै वो एक मुश्ते-गुबार हूँ अशा वैफल्याच्या ओळी लिहिणारे, मोगल साम्राज्याचा शेवटचे बादशहा ठरलेले बहादूरशहा जफर यांचे जीवन म्हणजे मूर्तिमंत शोकांतिका आहे,’ अशी खंत ज्येष्ठ उर्दू पत्रकार शमीम तारिक यांनी व्यक्त केली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language